काल रात्री आमच्या घरी,
उंदीर आला छोटा,
त्याला पाहून आमचा उडाला,
गोंधळ केवढा मोठा!
छोटा होता चपळ फार,
धावे इकडून तिकडे,
आम्ही त्याला घाबरत होतो,
तो ही आम्हाला घाबरे,
हळूच तोंड बाहेर काढून,
नाक उडवीत होता,
त्याला कोणी पाहत नाही
याची खात्री करून घेत होता,
तो दिसताच पळवुन लावायला,
मी झाडू घेउन थांबले,
बाहेर येताच पिटुकला,
मीच घाबरून पळाले.
रात्रीपासूनआम्ही त्याच्या,
मागे पळत होतो,
त्याच्यापेक्षा आम्हीच जास्त
उडया मारत होतो.
छोटा होता मस्तीखोर,
त्याने नाना करामती केल्या,
एवढ्याशा उंदराने सार्या
घराला वेठीस धरले.
पिटुकला होता गोंडस फार,
आम्हाला जाम हसवले.
बाबाही आमचे आहेत धीट,
त्याला बरोबर बाहेर काढले.

No comments:
Post a Comment